14 वर्षांपूर्वी हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला केलं होतं असं काही.. आठवून अजूनही लाजते ऐश्वर्या..

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. याच बॉलिवूडने जश्या ऑन स्क्रीन जोड्या बनवल्या आहेत तसेच बर्याच रिअल लाईफ जोडप्याना जोडण्यात ही बॉलिवूड इंडस्ट्रीचा खूप मोठा हात आहे. अनेक सेलेब्रिटी असे आहेत जे या माध्यमातून एकमेकांना भेटले..

एकमेकांच्या प्रेमात पडले.. आणि मग विवाहबंधनात अडकले. असंच एक सर्वांचं आवडतं जोडपं म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन.१९९४ साली झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ऐश्वर्या जगज्जेती ठरली होती. त्यानंतर ऐश्वर्या रायला बॉलिवूड मधून अनेक ऑफर्स येऊ लागल्या.

बॉलिवूड मध्येहि तिने एका पेक्षा एक चांगले चित्रपट केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात घर करू यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तसेच अभिषेक बच्चननेही बॉलिवूड मध्ये खूप चांगले चित्रपट देऊन चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.

ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृ’त्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये याचदरम्यान ऐश्वर्या तिच्या ‘और प्यार हो गया’ या पहिल्या चित्रपटाचे शूटींग करत होती.

या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट होता बॉबी देओल. बॉबी हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याचठिकाणी अभिषेक ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता.

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ‘बंटी और बबली’या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्याचे शूटींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे ‘उमराव जान’मध्ये दिसले.

या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. ‘गुरु’च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, मी आणि ऐश्वर्या ‘गुरु’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्याचवेळी येथील हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून मी ऐश्वर्याबद्दल विचार करत होतो. .

ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्य किती आनंदी असेल, असा विचार माझ्या मनात सुरु होता. यानंतर टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये ‘गुरु’च्या प्रीमिअरदरम्यान आम्ही न्यूयॉर्कच्या त्याच हॉटेलात थांबलो होतो. मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला प्रपोज केले.

फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज अभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्याने याबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे, तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो, असे ती म्हणाली होती.

२००७ मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि याचवर्षी २० एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले. 

.