अभिषेकच्या आधी ऐश्वर्यानं केलं होतं आणखी एक लग्न, कारण होतं फारच विचित्र

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी मानलं जातं. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं होतं. आज ही जोडी सर्वांना कपल गोल्स देताना दिसते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाच्या सर्व विधी या बच्चन कुटुंबीयांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात पार पडल्या होत्या.

पण फार कमी लोकांना माहिती आहे की अभिषेकशी लग्न करण्याआधी ऐश्वर्यानं आणखी एक लग्न केलं होतं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न हे आजपर्यंत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या बॉलिवूड वेडिंग्सपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाबाबत बऱ्याच गोष्टी ऐकिवात आहे. अर्थात या खऱ्या आहेत किंवा खोट्या याची पुष्टी झालेली नाही.

मात्र अनेकदा असं सांगितलं जातं की, अभिषेकशी लग्न करण्याआधी ऐश्वर्या रायचं एक लग्न झालं होतं. ऐश्वर्याचं एका झाडासोबत लग्न लावण्यात आलं होतं आणि असं करण्यामागचं कारणही खूपच विचित्र आहे.काही रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायला मंगळ दोष असल्यानं ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न फार काळ टिकणार नाही असं बोललं गेलं होतं.

त्यामुळे ऐश्वर्यानं अभिषेकशी लग्न करण्याआधी एका झाडाशी लग्न केलं ज्यामुळे मंगळ दोषाचा प्रभाव संपेल. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न मुंबईमध्ये पार पडलं. ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. आज ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या वैवाहिक आयुष्यात खुश असून या दोघांना आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे.

अभिषेक ऐश्वर्याच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं तर या दोघांची ओळख पहिल्यांदा ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर २००० साली झाली होती. त्यावेळी दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. पण २००६- २००७ च्या दरम्यान गुरू चित्रपटाच्या सेटवर या दोघांमधील जवळीक वाढली. याच चित्रपटाच्या टोरंटो प्रिमियरच्या वेळी अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं.

या दोघांनी ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘गुरू’ आणि ‘धूम २’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.