पारंपरिक वेशात असून देखील ही अभिनेत्री झाली ट्रोल, नेमकं असे काय होते तिच्या कपड्यात

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन मोठ्या पडद्यापासून दूर असतानाही आपल्या क्लासिक स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्यानं आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच, शिवाय तिनं सिनेमांमध्ये एकापेक्षा एक सुंदर लुक सहजरित्या कॅरी केले होते; त्या स्टाइलचा ट्रेंड आजही कायम आहे.

ऐश्वर्याची मोहक व सुंदर स्टाइल स्टेंटमेंट फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील भलीमोठी आहे.पारंपरिक वेशभूषेमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन सुंदरच दिसते, यात कोणतीही शंका नाहीच. आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवरील पिवळ्या रंगाच्या साडीतील मोहक लुक असो किंवा लाल रंगाच्या ड्रेसमधील आकर्षक लुक; ऐश्वर्या ‘देसी फॅशन क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आहे.

तसंच चर्चेत राहण्यासाठी ही अभिनेत्री आपल्या स्टाइलला ग्लॅमरस टच देते, असेही मुळीच नाही. पण कधी-कधी एखाद्या चुकीमुळे अभिनेत्रीची फॅशनच फसल्याचे उदाहरण अनेकदा पाहायला मिळालं आहे. २०१३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यानही असेच काहीसे घडलं होतं.

या कार्यक्रमासाठी ऐश्वर्यानं डोक्यापासून ते पायापर्यंत ‘सोन परी’ लुक कॅरी केला होता.रेड कार्पेट इव्हेंटसाठी ऐश्वर्या राय-बच्चनने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर तरुण ताहिलानी यांनी डिझाइन केलेली सोनेरी रंगाची कशीदाकारी पॅटर्न साडी नेसली होती. यावर तिनं मॅचिंग ब्लाउज देखील परिधान केलं होतं.

ऐश्वर्याची ही साडी तयार करण्यासाठी शीर आणि नेट यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. साडीच्या हेमलाइनवर गोल्डन गोटा पट्टीची मोठी बॉर्डर आपण पाहू शकता. साडीला स्टायलिश लुक मिळावा, यासाठी पदरावर पॅच डिझाइनमध्ये मोठमोठे फ्लोरल मोटिफ्स देखील जोडण्यात आले होते, रेशीमच्या धाग्यांपासून हे काम करण्यात आलं होतं.

एकीकडे गडद रंगसंगतीमुळे ऐश्वर्या राय-बच्चनची साडी लोकांच्या डोळ्यांना खुपत होती, तर दुसरीकडे वजनदार पॅटर्नमधील हायनेक ब्लाउजचे डिझाइन देखील लोकांना फारसं आवडलं नाही. हे ब्लाउजचे डिझाइन साडीशी अजिबातच मिळतेजुळते नव्हते. तसंच ब्लाउजचे हाफ स्लीव्ह्ज आणि हायनेक पॅटर्न शोभून दिसतं नव्हते.

साडीव्यतिरिक्त गडद मेकअपमुळेही ऐश्वर्याचा लुक अधिकच खराब दिसत होता.पीच न्यूड लिपस्टिक, बीमिंग हाइलाइटर, ड्रमॅटिक आईज, चमचमणारे आईशॅडो, गोल्डन झुमके आणि हाय बिग बन हेअरस्टाइल अशा लुकमध्ये ऐश्वर्या अजिबातच आकर्षक दिसत नव्हती.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा देशातच नव्हे तर परदेशातही पाहायला मिळते. हे माहीत असतानाही ऐश्वर्या राय-बच्चनने अशा पद्धतीच्या पेहरावाची निवड का करावी? हा प्रश्न तिच्या चाहत्यांसमोर उपस्थित झाला होता.

फॅशनच्या बाबतीत ऐश्वर्या अशी काही चूक करेल, याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. या लुकमुळे ऐश्वर्याला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.