हिरो तर सोडाच, बापासोबतही रोमान्स करताना मागे नाही हटल्या या सुप्रसिद्ध अभिनेत्र्या.. एकीने तर 31 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत..

बॉलिवूड नावाने ओळखल्या जाणाऱ्या आवल्या भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचे वय जास्त महत्त्वाचे असते. बहुतेक वेळा असे दिसून येते की प्रसिद्धी मिळवण्यासाठी अभिनेत्र्या आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आपल्यापेक्षा 10, 20 किंवा 30 वर्षे मोठ्या वयाच्या अभिनेत्यांसह देखील काम करायला तयार होतात. आणि या इंडस्ट्रीत नाव कमावतात.

पण बर्‍याच प्रसंगी अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा तरूण अभिनेत्यांसमवेतही काम केले आहे. काही अभिनेत्र्यांनी दशकच्या दशक या इंडस्ट्रीत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे त्यांना दिग्गज अभिनेतेच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबतही काम करण्याची संधी मिळाली. चला आज जाणून घ्या अशा काही अभिनेत्रींविषयी ज्यांनि वडील आणि मुलगा दोघांसोबत काम केलंय..

हेमा मालिनी:हिंदी सिनेमात ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनीने ‘सपना के सौदागर’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्यासोबत रोमान्स केला आहे. त्याचबरोबर हेमा यांनी राज कपूर यांचे सुपुत्र दिवंगत ऋषी कपूरसोबत ही काम केले आहे. दोघे नसीब, एक चादर मैली सी यासह अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत.

डिंपल कपाडिया: 70 आणि 80 च्या दशकात डिंपल कपाडियाने अनेक चमकदार चित्रपटांमध्ये काम केले. डिंपल कपाडिया यांनी अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार असलेल्या राजेश खन्नाशी लग्न केले. डिंपल कपाडियाने ‘खू’न का कर्ज’,’बटवारा’, ‘लेकिन’ सारख्या बर्‍याच चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्याबरोबर रोमान्स केला. त्याच वेळी, डिंपलने दिल चाहता है या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाबरोबर रोमान्स केला होता.

माधुरी दीक्षित: आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि नृत्याने कोट्यावधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेली प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

माधुरी दीक्षित बऱ्याच काळापासून चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे, जरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. माधुरीने विनोद खन्ना आणि त्याचा मुलगा अक्षय खन्ना या दोघांसोबत काम केले आहे. अक्षय सोबत ‘मोहब्बत’ या चित्रपटात तर विनोद खन्नासमवेत ‘दयावान’ या चित्रपटात दिसली होती.

जया प्रदा: तिच्या काळातील सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्री असलेल्या जया प्रदा चादेखील या यादीमध्ये समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या बर्‍याच संस्मरणीय आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणार्‍या जया प्रदा यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांच्यासोबतही काम केले आहे. धर्मेंद्र आणि जया प्रदा यांनी गंगा तेरे देश में, शहजादे, फरिश्ते या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. जया प्रदा आणि सनी देओल वीरता आणि जबरदस्त सारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

ऐश्वर्या राय-बच्चन: माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट आणि सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन यांनी आपल्या अदाकारीने जगभरात एक ओळख निर्माण केली आहे. जगभरात कोट्यावधी लोकांचे हृदय जिंकलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने तिचे सासरे ज्येष्ठ अमिताभ बच्चन आणि त्यांचे पती अभिषेक बच्चन या दोघांसोबत काम केले आहे.

‘बंटी और बबली’ चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. त्याचवेळी या चित्रपटातील कजरा रे गाण्यात ऐश्वर्या ने एंट्री केली होती. या गाण्यात ऐश्वर्याने अमिताभ आणि अभिषेक या दोघांसोबत रोमान्स केला. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अमिताभ यांच्यात वयात 31 वर्षांचा फरक आहे.