‘बाबूजी जरा धीरे चलो’ म्हणत रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री , या धक्कादायक कारणामुळे बॉलिवूडमधून झाली गायब..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला स्वप्न नगरी असे देखील म्हटले जाते. अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार..

गेल्या काही दशकात अनेक कलाकारांनी आपल्या भुमिकांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आणि या भूमिका अजरामर झाल्या. आजही अनेक आशा भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. परंतु काही असे कलाकार देखिला आहेत ज्यांची करिअरची सुरवात तर अतिशय भन्नाट झाली पण नंतर काळाच्या ओघात त्यांचा विसर पडला.

आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जी खरंतर मूळ ची भारतीय नव्हती. पण तिने बॉलिवूड मध्ये एका म्युझिक अल्बम द्वारे पदार्पण केले. पदार्पणातच ती सुपरहिट ठरली. परंतु नंतर मात्र आपली जादू कायम ठेवू शकली नाही.

बाबूजी जरा धीरे चलो हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री याना गुप्ता आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. यानाने या गाण्यात म्हशीवर बसून एंट्री घेतली होती. तिचा डान्स जबरदस्त हिट ठरला होता. याना हिने नुकताच आपला 42 वा वाढदिवस साजरा केला आहे. याना या चित्रटानंतर अनेक चित्रपटांमध्ये झळकली.

शेवटी ती ‘म- र्ड- र २’ या चित्रपटात झळकली होती. २०११ पासून याना चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. याना ही मुळची ब्रनोतील असून तिने सोळाव्या वर्षी तिच्या मॉडलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. जपानमध्ये देखील ती मॉडलिंग करत होती. त्यानंतर काही वर्षांनी ती भारतात आली.

भारतात आल्यावर सुरुवातीचे काही वर्षं ती पुण्यातील ओशो आश्रम मध्ये राहात होती. तिने सत्यक गुप्तासोबत तिची ओळख झाली आणि काहीच वर्षांत त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. २००१ मध्ये त्यांचे लग्न झाले. पण लग्नानंतर काहीच वर्षांत म्हणजेच २००५ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. 

२००१ मध्ये तिने भारतात मॉडलिंग करायला सुरुवात केली. तिला सुरुवातीच्याच काळात लॅकमेसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडलिंग करण्याची संधी देखील मिळाली. किंगफिशरच्या महत्त्वाच्या मॉडेलपैकी ती एक मानली जात असे. दम या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड मध्ये एंट्री केली. या चित्रपटातील बाबूजी जरा धीरे चलो या आयटम साँगमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 

तिने काही वर्षांपूर्वी हाऊ टू लव्ह युअर बॉडी अँड गेट द बॉडी यू लव्ह हे पुस्तक देखील लिहिले होते. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या प्रसिद्धीनंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. झलक दिखला जा या कार्यक्रमात देखील ती झळकली होती. 

.