90च्या दशकातील ‘या’ सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रसिद्धीसाठी केलं होतं टॉप-लेस फोटोशूट.. आज ही वाटतेय खंत..

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.

ही तर झाली दिग्गज अभिनेत्यांची गोष्ट. परंतु त्याच दरम्यान मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यांना तोडीस तोड अभिनेत्र्यांचा देखील उदय होत होता. अनेक अभिनेत्र्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागल्या होत्या. त्यांचं काम बघून मराठी चित्रपट सृष्टीत स्त्रीपात्र मुख्य भूमिकेत असलेले चित्रपट बनू लागले. अशीच एक सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर.

मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे.

त्यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.वर्षा उसगांवकर आज चित्रपटात खूपच कमी काम करत असल्या तरी त्या अनेक समारंभात, पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका कोंकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकामध्ये काम केले होते.

वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 19 वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते

मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत त्या अनेक चित्रपटात झळकल्या होत्या.

गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटात नेहमीच सोज्वळ आणि बबली गर्लच्या भूमिका निभावल्या. त्यांच्या या अदाकारीने त्यांनी अनेक प्रेक्षकांची हृदये जितकी. परंतु ऐन प्रसिद्धीच्या काळात असताना त्यांनी केलेल्या एका फोटोशूटमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. ज्याची अनेक चाहत्यांनी टीका देखील केली होती.

वर्षा उसगावकर यांनी एका मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. या फोटोशूट मध्ये त्या पूर्णपणे टॉप-लेस दिसल्या होत्या. अशा प्रकारचं अंग प्रदर्शन मराठी सृष्टीत पहिल्यांदाच झाले असल्याने त्या टीकेच्या धनी झाल्या. नुकत्याच काही काळापूर्वी या विषयावर बोलताना त्या भावूक झाल्या आणि त्यांना अजूनही त्या चुकीची खंत वाटते.

वर्षा यांचे त्याकाळात अनेक कलाकारांशी नावे जोडले जात पण त्या निव्वळ अफवा ठरत. वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत संसार थाटला आहे.