मुंबईच्या रेड लाईट एरिया मध्ये जाऊन भावुक झाली अभिनेत्री.. म्हणाली आठवले जुने दिवस..

आपल्याला माहीतच आहे की कोरोना काळात प्रसार रोखण्यासाठी साठी भारतात अभूतपूर्व लॉकडाऊन घोषित करण्यात आला. याचा मोठा फटका बॉलीवूड क्षेत्राला देखील बसला होता कारण सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होत. आणि थिएटर्स बंद असल्यामुले चित्रपट रिलीज देखील झाले नाहीत. त्यामुळे हा काळ सर्वच कलाकारांनी घरी बसूनच व्यतीत केला.

लॉकडाउन आणि सुरक्षितता नियमावली मुळे थांबलेल्या अनेक बड्या चित्रपटांची शुटींग पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘इंडिया लॉकडाउन’, ज्यामध्ये श्वेता बसू प्रसाद महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील तिच्या पात्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी श्वेताने चक्क मुंबईच्या रेड लाईट परिसराला भेट दिली. वास्तविक श्वेता बसू लवकरच ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात ती एक से-क्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी श्वेताने नुकतीच मुंबईच्या रेड लाईट भागाला भेट दिली. या दरम्यान तिने तेथील से-क्स वर्कर्सशी संवाद साधला. या चित्रपटातील श्वेता बसूच्या पात्राचे नाव मेहरूनिसा असे सांगितले जात आहे.

या पात्राची सखोल माहिती मिळवण्यासाठी भंडारकर आणि श्वेता यांनी मुंबईतील कामठीपुरा या वै-श्या वस्ती असलेल्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. तेथे त्यांनी से-क्स वर्कर्सचे जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूड अभिनेत्री श्वेताने पहिल्यांदाच रेड लाईट एरियाला भेट देण्याचा आपला अनुभव शेअर केला. श्वेताने सांगितले की, ‘मला विश्वास आहे की मी जी पात्रं साकारत आहे ती खरी आहेत आणि मला त्यांच्या भूमिकेत आकंठ बुडायचे आहे. जोपर्यंत मी हे करणार नाही तोपर्यंत मी हे पाठ प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवू शकणार नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला असे वाटले होते की या पात्राच्या दृष्टीने माझी बोलण्याची शैली खूप मऊ आणि कोमल आहे.

श्वेता असेही म्हणते की, या भेटीचा मुख्य हेतू तेथील से-क्स कामगारांची बोली समजणे हा होता. ती स्पष्ट करतात, “मला बोलण्याची पद्धत बदलावी लागेल हे निश्चित आहे. तसेच, पात्रांच्या जीवन शैलीतील लहानसहान गोष्टी जाणून घ्याव्या लागतील आणि त्यासोबत सुसंवाद साधण्याची गरज आहे, जेणेकरून मी या पात्रात फिट होऊ शकेन. मी या से-क्स कर्मचार्‍यांना भेटावे आणि त्यांचे जीवन जवळून पहावे आणि त्यांचे विचार समजून घ्यावे अशी मधुरची इच्छा होती. “

अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती वाटण्याबद्दल विचारले असता, श्वेता म्हणाली की ती पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे आणि तिने या गोष्टी पाहिल्या आणि चित्रित केल्या आहेत. तो म्हणाला की मी तिथे जाणे माझ्या कामाशी संबंधित आहे. होय, जर काही संकोच वा भीती जर कोणत्या गोष्टीची होती तर ती इतकीच की माझ्याकडून त्यांना अनावधानाने एखादा प्रश्न विचारला जाऊ नये ज्याने ते दुखावले जातील “

आपल्या भूमिकेची तयारी करत असलेली श्वेता तिच्या पात्रात आणखी सुधारणा करण्यासाठी या दिवसात जुने हिंदी चित्रपट पाहत आहे. तिने आतापर्यंत मधुर भांडारकर यांनी बनविलेले चांदनी बार, चमेली आणि ट्रॅफिक सिग्नल पाहिले आहेत. याशिवाय त्यांनी स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचा क्लासिक चित्रपट ‘मंडी’ ही पाहिला आहे. 2015 मध्ये, श्वेता बसूचे नाव हैदराबादच्या बंजारा हिल्स येथे से-क्स रॅकेटमध्ये होते. श्वेता सुमारे 2 महिने रेस्क्यू होममध्ये राहिली त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले.