ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जन्मली होती तिच्या आईच्या लग्नाआधीच.. बाप दिग्गज अभिनेता..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. पण याच बॉलिवूड मध्ये अनेकदा अश्या घटना घडतात ज्या आपल्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या असतात

आपल्या येथे आधी मुलींचे रीती-रिवाजांनुसार लग्न होते आणि मग मुली त्यांच्या सासरी जातात. त्यानंतर ती तिच्या नवर्याशी संबंध बनवते आणि त्यानंतर ती मुलगी गर्भवती होऊन मुलाला जन्म देते. पण जर एखादी मुलगी लग्नाआधी गर्भ-वती झाली. तर मात्र तिला समाजात मान खाली घालून वावरावं लागतं.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्नाआधी प्रेमसं बंध होते. त्यानंतर, अभिनेत्री लग्न न करता गर्भ-वती झाल्या आणि एवढेच नव्हे तर त्यांची लग्नापूर्वीची मुलेही आज बॉलिवूडमध्ये आपले नाव कमवत आहेत. अशा नात्यात काही अभिनेत्री गरोदर राहूतात. पण त्यांचा समाजाशी काहीही संबंध नाही. कोण काय म्हणेल याची त्यांना भीती वाटत नाही. अशा अभिनेत्रींसोबत असे काही घडले तर त्यांच्यात तेवढे गांभीर्य नसते. त्याऐवजी त्या त्यांचे आयुष्य आनंदाने जगतात.

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्या आईने तिला लग्नाअगोदर जन्म दिला होता, चला तर मग पाहूया, ही अभिनेत्री कोण आहे? आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती इतर कोणी नाही तर श्रुती हासन नावाची दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे.

अभिनेता कमल हासन आणि सारिका यांची मोठी मुलगी श्रृती हासनने हिंदी सिनेमांसह दाक्षिणात्य भाषेतील अनेक सिमेमांमध्ये काम केलं आहे. वडिलांप्रमाणे श्रृतीला ओळख निर्माण करता आली नसली तरीही तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, श्रृतीचा जन्म कमल आणि सारिका यांच्या लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच झाला होता.

श्रृतीने चेन्नईमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिने मुंबईतील सेन्ट अँड्यूज कॉलेजमधून सायकॉलोजी विषयात पदवी घेतली. संगीत शिकण्यासाठी श्रृती कॅलिफोर्नियातही गेली होती. एवढंच नाही तर कमल हासन यांच्या ‘चाची ४२०’ सिनेमासाठी तिने एक गाणंही गायलं आहे. श्रृतीने ‘हे राम’ सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होते. यानंतर तिने लक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘दिल तो बच्चा है जी’, ‘रमैया वस्तावैया’, ‘वेलकम बैक’ आणि ‘गब्बर’ सिनेमात काम केलं. पण यातल्या कोणत्याच सिनेमाने तिला यश मिळवून दिलं नाही.

कमल हासन आणि सारिका दोघं अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. याचवेळी सारिका गरोदर राहिल्या आणि त्यांनी श्रृती हासनला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी १९८८ मध्ये कमल आणि सारिका यांनी लग्न केलं. लग्नानंतर सारिका यांनी सिनेमात काम करणं बंद केलं. १९९१ मध्ये कमल आणि सारिका यांना दुसरी मुलगी अक्षरा झाली.