‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) काही दिवसांपूर्वी पती-अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi) समवेत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यांची ही व्हेकेशन ट्रीप खूप मजेशीर होती.
या ट्रीप दरम्यान त्यांनी बरेच फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले. दरम्यान, शेफालीने एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती Oops मूमेंटला बळी पडली आहे. आता तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल देखील होत आहे
वास्तविक, या व्हिडीओत अभिनेत्री शेफाली जरीवाला एका क्रूझवर पतीसोबत टायटॅनिक पोज देत होती. यावेळी, तिचा नवरा पराग त्यागीही तिच्याबरोबर होता. दोघेही आपली व्हॅकेशन एन्जॉय करण्यात मग्न असताना हा प्रसंग घडला.
शेफालीने यावेळी लेस स्टाईलचा पांढरा ड्रेस परिधान केला होता, जो जोरदार वाऱ्यामुळे उडायला लागला आणि ‘Oops’ मूमेंटची शिकार झाली. शेफालीने हा क्षण अत्यंत शिताफीने सावरला आहे. परंतु हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये या क्षणा नंतरही शेफाली जरीवालाचे स्वतःकडे काहीच लक्ष नव्हते आणि ती पोज देतच राहिली. आणि या व्हेकेशन मोडमध्ये धमाल करत राहिली. आता दोन दिवसांपूर्वी शेफालीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
जरी शेफाली यात काही वावगे वाटले नसली तरी सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नेमका तो क्षण पकडला आहे आणि अभिनेत्रीवर कमेंट करून ते तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शेफालीने मात्र ट्रॉलर्सकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेफालीच्या या व्हिडीओवर नेटकरी मात्र भरभरून कमेंट्स करत आहेत. कोणीतरी म्हणतंय की, ‘हवा में उड़ाता जाए’, कोणीतरी लिहिते की, ‘आम्ही सर्वांनी पाहिले’ आणि बर्याच लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
शेफाली पती परागसमवेत काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. शेफालीने या सुट्टीचा खूप आनंद लुटला. शेफाली जरीवाला मालदीवहून परत येताच ती सिक्कीमला देखील गेली होती आणि तिथल्या सहलीत देखील धमाल केली होती.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर, शेफाली मागील वर्षी ‘बिग बॉस 13’ मध्ये शेवट दिसली होती. बर्याच दिवसानंतर ती टीव्ही पडद्यावर दिसली होती.