शिल्पा पेक्षा अनेक पटीने हॉ-ट होती तिची बहीण.. पण केली ही एक चूक आणि झालं करिअर ब-र-बाद..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला स्वप्न नगरी असे देखील म्हटले जाते. अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार..

गेल्या काही दशकात अनेक कलाकारांनी आपल्या भुमिकांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आणि या भूमिका अजरामर झाल्या. आजही अनेक आशा भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. परंतु काही असे कलाकार देखिला आहेत ज्यांची करिअरची सुरवात तर अतिशय भन्नाट झाली पण नंतर काळाच्या ओघात त्यांचा विसर पडला.

आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी चित्रपटात येण्या आधीच लोकप्रिय होती कारण ती सुपरस्टार अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण होती. परंतु अभिनयामध्ये मात्र ती आपली जादू कायम ठेवण्यात असमर्थ ठरली आणि लोकांच्या विस्मरणात गेली. आणि आता एक सामान्य आयुष्य जगत आहे.

होय, आमही बोलत आहोत अभिनेत्री शमिता शेट्टी बद्दल. बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने नुकतीच वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 फेब्रुवारी 1979 रोजी जन्मलेल्या शमिताने ‘मोहब्बतें’ या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा सिनेमा हिट ठरला, मात्र शमिता हिट होऊ शकली नाही. सततच्या अपयशामुळे तिने फिल्मी दुनियेतून काढता पाय घेतला आहे.

मोहब्बतें’सारख्या मल्टीस्टारर सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात करणा-या शमिताला बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही. तिच्या प्रमुख सिनेमांमध्ये ‘मेरे यार की शादी है’, ‘फरेब’, ’जहर’, ‘बेवफा’, ‘कॅश’ या सिनेमांचा समावेश आहे. जून 2011 मध्ये शमिताने बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा केली. आता इंटेरियर डिझायनिंगकडे तिने आपला मोर्चा वळवला आहे.

मोहब्बतें’ या पहिल्याच सिनेमात शमिता बोल्ड अंदाजात पडद्यावर अवतरली होती. ‘साथिया’ आणि ‘मेरे यार की शादी है’ या सिनेमांमध्ये तिने आयटम नंबरदेखील केले आहेत. सिनेमे आणि फोटोशूट्समध्ये तिचा लूक बोल्ड आणि ग्लॅमरस होता. मात्र तरीदेखील तिला या बोल्डनेसचा फायदा करिअरमध्ये होऊ शकला नाही

बोल्ड रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा फॉर्मुला केवळ शमितासाठीच नव्हे तर अनेक अभिनेत्रींसाठी फ्लॉप ठरला आहे. गेल्या काही वर्षांत बोल्ड एन्ट्री घेणा-या अभिनेत्रींचे बॉलिवूड करिअर संपुष्टात आले आहे. परंतु शमिता ही बोल्ड तर होतीच पण तिच्या अभिनयाचा पैलू ही अनेक चित्रपटात दिसून आला होता.

परंतु शमीता च बॉलिवूड करिअर शिल्पा सारख यशस्वी होऊ शकलं नाही यामागे अनेक कारणे आहेत. तिच्या कारकीर्दीबद्दल बोलताना शमिताने एका मुलाखतीत सांगितले होते की मी एक महान नायिका होऊ शकली असती पण मी काही चित्रपट खूपच जास्त विचार करून निवडत होते. माझ्या वाट्याला हवे तसे चित्रपट आले नाहीत. त्यामुळे माझ्या कलागुणांना वाव मिळाला नाही.