सर्वांची लाडकी छोटीशी ‘गंगुबाई’ आता दिसतेय इतकी सुंदर.. फोटोज झाले व्हायरल..

अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत बालकलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.

पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. कारण त्यानंतर अनेक कलाकारांचा टिव्ही सोबत फारसा संबंध नाही राहिला. अनेकांनी आपल्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले. किंवा मग वयोमानाने चेहरे बदलल्याने ते आपल्या विस्मरणात गेले. तर चला आपण आज जाणून घेऊयात अशाच एका बाल-कालाकाराबद्दल..

काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजन वर ‘छोटे मियाँ’ नावाचा एक शो आला होता ज्यामध्ये अनेक बालकलाकारांनी सहभाग नोंदवला होता. बालकलाकारांच्या अदाकारीला एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून या शो ची निर्मिती करण्यात आली होती. हा कार्यक्रम भरपूर यशस्वी ठरला आणि यातील भरपूर पात्रे गाजली होती.

पण त्यातील एक पात्र भलतंच गाजलं ते म्हणजे ‘गंगुबाई’. आपल्या सर्वांचं लाडकं गंगुबाई हे पात्र साकारलं होत छोट्याश्या ‘सलोनी’ ने तेव्हा सलोनी ही खूपच गोङ दिसत होती. तिच्या गुबगुबीत सौंदर्यानं ती खरीखुरी गंगूबाईच दिसत होती. तिचं ते अल्लड हसणं, खिदळणं तिच्या चाहत्या बालकलाकारांना आजही आठवतं.

नऊवारी साडी, हातभर चुडा आणि कपाळावर कुंकू असा हा या लहानग्या गंगूचा वेश होता.पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपली लहानशी ही गंगूबाई आता बरीच मोठी झाली आहे. इतकचं नव्हे, तर तिचं आताचं रूप पाहून तुम्हांला देखील विश्वास बसणार नाही. काही वर्षांपूर्वी जाडजूड असलेल्या या गंगूचं एका सुंदर तरुणीत परिवर्तन झाले आहे, आणि तिचं हे देखणं रूप पाहून तुम्ही पण चकित व्हाल.

सलोनी ने एकदा एका खाजगी मुलाखतीत म्हणाली होती, ती अगोदर खूपच जाड होती. तिला तिच्या घरी नातेवाईक तसेच मित्र- मैत्रीणी बरेच टोमणे मारायचे. एवढच नाही तर जेव्हा ती आपले फोटोज् सोशल मीडियावर शेअर करायची. तेव्हा तिला खूप विक्षिप्त कमेंट्स देखील यायच्या. त्यावर सलोनीला खूप वाईट वाटायचं.

एकदा तर तिच्या फोटोला ‘अजून किती खात राहशील, एक दिवस म्हशीसारखी होऊन तू फुटून जाशील’ अशी कमेंट आली होती. अशा अनेक कमेंट्समुळे तिला वाईटही वाटायचं आणि राग ही यायचा.त्यामुळे सलोनी सतत विचार करायची, की तिला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.

सलोनी ने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे, ती म्हणते एकदा लॅपटॉप च्या बंद स्क्रीन वर मला माझा चेहरा त्या स्क्रीनवर दिसला. मी स्वतःला दोष देत होते की, मी एवढी जाड का आहे. तेव्हा माझे वजन तब्बल 80 किलो होते. त्या क्षणी मी ठरवले की, काहीही झाले तरी चालेल, वाटेल तेवढे प्रयत्न करून मला माझे वजन कमी करायचे आहे.

प्रयत्न केले तर सगळे काही शक्य होते, हे सलोनी ने खऱ्या अर्थाने दाखवून दिले. आज सलोनी एक सुंदर, आणि अगदी सडपातळ झाली आहे. अशी तिच्याकडे पाहून सहज कुणालाही भुरळ पङेल, इतकी मोहक रुपवान दिसते. ‘बडे भय्या की दुल्हनिया’ या टीवी शो मध्ये ती शेवटची दिसली होती.