20 वर्षांपूर्वी अचानक जग सोडून गेली ही एकेकाळची टॉपची अभिनेत्री.. एका अपघातामुळे झाले होते करिअर बरबाद..

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.

अशा वेळी जेव्हा या इंडस्ट्री मध्ये फक्त अभिनेत्यांचा दबदबा कायम होता त्यावेळी अभिनेत्र्यांना फक्त नावापुरते रोल मिळत असत. नंतर मग या इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्र्यांनी एन्ट्री केली ज्यांच्या येण्याने हे चित्र पालटले. अनेक स्त्रीप्रधान पात्रांचे चित्रपट चित्रित करण्यात आले. अभिनेत्री स्मिता पाटील, किशोरी शहाणे अश्या अनेक अभिनेत्र्यानी एक काळ गाजवला.

अशातच एक अभिनेत्री अजून होती, जिचे करिअर फार काळ नव्हते, परंतु तिने जितके चित्रपट केले तेव्हा तेव्हा ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या सोबतची तिची जोडी तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. होय आम्ही बोलत आहोत अभिनेत्री रंजना बद्दल.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांनी व्ही. शांताराम निर्मित आणि किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रंजना या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी होत्या. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. त्यांनी खूपच कमी वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटानंतर व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात रंजना यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. खूपच कमी वेळात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती आणि त्यासाठी त्यांनि मेहनत देखील तितकीच घेतली होती.

सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. त्यांना ऐंशीच्या दशकातील सगळ्यात यशस्वी अभिनेत्री मानले जात असे. त्यांच्या अभिनयावर, सौंदर्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. अनेक नायिकाप्रधान चित्रपटात त्यांनी काम केले. पण एका अप-घाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. रंजना १९८७ मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अप-घात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. हा अप-घात घडला, त्यावेळी मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना काहीही झाले नाही.

हा अप-घात घडला त्यावेळी रंजना या केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर अनेक वर्षं व्हीलचेअरवरच होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवर काढली. २००० मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय वि-काराने नि-ध-न झाले. अप-घातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृ-त्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते. या नाटकाला प्रेक्षकांनी हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.