जेव्हा वयाच्या 16व्या वर्षी बॉयफ्रेंड सोबत रुम मध्ये ‘अशा’ अवस्थेत सापडली होती प्रियांका..

बॉलिवूड मध्ये चर्चेत राहण्यासाठी कलाकार काय काय करतील ह्याचा काही नेम नाही. आता कोरोनाकाळात तर चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत तर अश्या वेळी चर्चेत राहण्यासाठी अशे प्रकार सर्रास घडत आहेत. अश्याच एका घटनेने सध्या बॉलिवूड मध्ये खळबळ माजली होती, ते म्हणजे एका अभिनेत्रीने दिलेल्या धक्कादायक विधानामुळे.

आपण सगळ्यांनी प्रियांकाला मॉडेल, अभिनेत्री किंबहुना गायिका म्हणून ही पाहिलं आहे. पण आता पहिल्यांदाच लेखिका प्रियांका आपल्या सगळ्यांसमोइ येणार आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या आपल्या मेमॉयर ‘अनफिनिश्ड’ मुळे चर्चेत आहे. जे 9 फेब्रुवारीला लॉन्च झाले आहे. या पुस्तकामध्ये तिने तिच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात एक किस्सा तिने शेअर केला आहे. हा किस्स्यामध्ये तिने तिच्या किशोरवयीन बॉयफ्रेंडविषयी सांगितले आहे.

प्रियंकाने या पुस्तकात नमूद केले की, ती शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली होती आणि एक दिवस तिच्या मावशीने तिला तिच्या प्रियकरासोबत पकडले होते. या वेळी तिने आंटीला बॉयफ्रेंड दिसू नये म्हणून त्याला कपाटात बंद केले होते. पण हे लक्षात आल्यानंतर आटींने प्रियंकाची तक्रार तिच्या आईकडे केली होती.

प्रियंका चोप्राने तिच्या या पुस्तकामध्ये या किस्स्याविषयी सांगितले की, काही वर्षांसाठी ती अमेरिकेत आपल्या नातेवाईकांकडे राहत होती आणि तिकडेच शाळेत जात होती. तेव्हा ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती. प्रियंकाने पुस्तकात लिहिले की, त्याचे नाव ‘बॉब’ होते. तसेच आंटीने तिला बॉयफ्रेंडसोबत कसे पकडले याविषयी तिने या पुस्तकात सांगितले आहे.

प्रियंकाने पुस्तकात लिहिले की, ती 10 वीत होती आणि त्यावेळी अमेरिकेत आपल्या किरण आंटीसोबत इंडियाना पोलिसमध्ये राहत होती. तेव्हा शाळेत तिची भेट ‘बॉब’सोबत झाली होती. आपल्या विनोदी आणि रोमँ-टिक स्वभावामुळे बॉबने प्रियंकाचे हृदय जिंकले होते.

प्रिंयाकने सांगितले की, बॉबने तिला एक चेनही गिफ्ट केली होती. दोघंही शाळेत एकमेकांचा हात पकडून फिरायचे. प्रियंका बॉबच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यासोबत लग्न करायचीही इच्छा होती. परंतु ते काही पूर्ण होऊ शकलं नाही कारण प्रियांका भारतात निघून आली.

प्रियंकाने त्यात लिहिले की, ‘एक दिवस मी आणि बॉब बेडवर बसून एकमेकांचा हात पकडून टीव्ही बघत होतो. तेव्हा मी खिडकीमधून पाहिले की, आंटी घरी येत आहे आणि मी खूप घाबरले. त्यावेळी दुपारचे 2 वाजत होते आणि ही त्यांची घरी येण्याची वेळ नव्हती.

तेव्हा बॉबला घराबाहेर हाकलण्याचा विचार मी केला परंतु तास काही पर्याय मला सापडला नाही. तेव्हा मी त्याला आपल्या खोलीच्या कपाटात बंद केले होते. यांनंतर मी त्याला म्हणाले होते की आंटीला घराबाहेर जात नाही तोपर्यंत बाहेर निघू नको.’

प्रियंकाने लिहिले, ‘किरण मावशी घरात आली आणि सर्व रुम चेक करु लागली. मी माझ्या बेडवर बसले होते आणि माझ्या हातात बायॉलजीचे पुस्तक होते. मी असे दाखवत होते की, मी अभ्यास करत आहे. मावशी माझ्या रुमच्या दरवाज्याजवळ आली आणि मला कपात उघडायला सांगितले. मी भितीने थरथरत होते, कारण मी माझ्या मावशीला एवढ्या रागात कधीच पाहिले नव्हते. मी कपाट उघडले आणि सर्व प्रकरण समोर आले. ‘

प्रियंकाने याविषयी पुढे लिहिले की, ‘मावशीने माझ्या आईला फोन केला आणि म्हटले की, मला विश्वास बसत नाही की, प्रियांका इतकी वाया गेली आहे.’ यानंतर प्रियंका भारतात परतली आणि तिने मिस इंडिया ब्यूटी पेजेंट स्पर्धेत भाग घेतला होता. ती हे जिंकली आणि मिस वर्ल्ड बनली. यानंतर ती रातोरात सुप्रसिद्ध झाली होती. तेव्हापासूनच तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.