”न-ग्न फिरणे हा काही गुन्हा नाही”.. म्हणत ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केलं अजब गजब विधान..

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हा कायमच आपल्या भारतीय जनतेचा आवडीचा विषय राहिलेला आहे. रोज या नाहीतर त्या कारणाने बॉलिवूड हा चर्चेचा भाग असतोच. या इंडस्ट्रीमध्ये घडणारी प्रत्येक घटना ही मीडिया तसेच सोशल मीडियाद्वारे आपल्या पर्यंत पोहोचत असतात. यातल्या काही घटना नकळत घडल्या असतील तरी अनेक घटना ह्या चर्चेत राहण्यासाठी घडवल्या जातात. सध्या कोव्हीड काळात बॉलिवूड अद्यापही पुर्णपणे सुरू न झाल्याने चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अ-श्लि-ल व्हिडीओ चित्रीत करून तो सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार हॉट अभिनेत्री पूनम पांडे हिने केला होता. याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. सोशल मिडिया वर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी या व्हिडीओची टीका केली होती.

ही घटना ताजी असतानाच आता समुद्र किनाऱ्यावर न्यू-ड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री पूजा बेदी हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने मिलिंद सोमणची बाजू घेत “जर न-ग्न-ता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक का करत नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे

मिलिंदच्या फोटोमध्ये काहीही अ-श्लि-ल नाही. तो फोटो पाहून कल्पना करणाऱ्यांच्या डोक्यात अ-श्लि-लता भरली आहे. त्याचा अपराध फक्त इतकाच आहे की चांगलं दिसण, प्रसिद्ध होणं आणि बेंचमार्क प्रस्थापित करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि त्यात काहीही वाईट नाहीये असं मला वाटतं. आणि इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्याला अटक करणं मला पटत नाहीये ”

यापुढे ती असं ही म्हणाली ”जर न-ग्न-ता हा अपराध असेल तर नागा साधूंना देखील अटक करा. ते केवळ शरीरावर राख लावतात म्हणून त्यांच्या न-ग्न-तेचा स्विकार नाही करु शकत.” अशा आशयाचं ट्विट करुन पूजाने मिलिंद सोमणला पाठिंबा दिला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यू-ड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ४ नोव्हेंबर रोजी आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यू-ड होऊन धावताना दिसला होता.

या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अ-श्लिल व्हिडीओचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.