टॉपच्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रसिद्धीसाठी सगळ्यांसमोर केलं होतं प्रिन्स चार्ल्स ला किस..

‘पद्मिनी कोल्हापुरे’ हे नाव ऐकताच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर राज कपूर यांच्या ‘प्रेमरो-ग’ चित्रपटाचा ‘ये गलियान ये चौबारा, यहा आना ना दोबारा’ गाण्याचे दृश्य सहजपणे येतात. पद्मिनी चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करायची, शिवाय कोणत्याही प्रकारची भूमिका करण्यात तिला कधीच अडचण नव्हती.

अभिनय जणू तिच्या र-क्तातच होता. म्हणूनच, वयाच्या 15 व्या वर्षीच तिने आपल्या अभिनयाची छाप सोडत बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. शिवाय पदार्पणापासूनच तिने बला-त्का-राच्या सारख्या दृश्यांसह प्रौढ चित्रपटांमध्ये देखील काम केले आणि प्रसिद्धीच्या झोतात आली.

पद्मिनी कोल्हापुरी यांचा जन्म १ नोव्हेंबर 1965 रोजी गीतकार पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या कुटुंबात झाला. पद्मिनीची मोठी बहीण तेजस्विनी आणि लहान बहीण शिवांगी आहेत. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. शिवांगी कोल्हापुरे ही अभिनेता शक्ती कपूरची पत्नी आहे. या नात्याने पद्मिनी ही अभिनेत्री श्रद्धा कपूरची काकू आणि शक्ती कपूरची मेव्हणी लागते.

पद्मिनी कोल्हापुरे या उत्तम अभिनेत्री तर होत्याच शिवाय उत्कृष्ठ गायिका देखील होत्या. किंबहुना त्यांनी करिअरची सुरुवात गायिका म्हणूनच केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांत गाणीही गायली आहेत. अनेकांना विश्वास नाही बसणार परंतु त्यांचे गायिका म्हणून पाहिले गाणे खुद्द किशोर कुमार यांच्या सोबत रेकॉर्ड झाले आहे. पद्मिनी यांनी किशोर कुमारसमवेत यादों की बारात हे गाणे गायले होते. यानंतर त्यांनी त्यांच्या बऱ्याच चित्रपटात स्वत: ची गाणी गायली.

गायिका म्हणून बॉलिवूड मध्ये पदार्पण केल्यानंतर हळू हळू पद्मिनी या अभिनय क्षेत्राकडे वळू लागल्या. त्यांनी कॉलेज पासूनच अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. पद्मिनी यांनी 1975 साली ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता देव आनंद यांनी केले होते. आशा आनंद भोसले यांनी देव आनंद यांना पद्मिनी यांचे नाव सुचवले होते

1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारतात आले होते. या दरम्यान एका चित्रपटाच्या शूटिंगवर पोहोचले. प्रिन्स चार्ल्स त्यावेळी अविवाहित व खूप लोकप्रिय होता. सेटवर पद्मिनी कोल्हापुरेसुद्धा उपस्थित होती. प्रिन्सभोवती खूप सुरक्षा होती. पद्मिनीने प्रिन्सला पाहताच तिने सुरक्षा तोडली आणि प्रिन्सजवळ पोचली आणि त्याचे चुं-बन घेतले. पद्मिनीच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी तिच्या ह्या कृत्याची टीका केला. अनेक समीक्षकांचं म्हणणं होतंकी एका नवख्या अभिनेत्रीने स्वतःहून हे पाऊल उचलणे योग्य नव्हते.

या घटनेनंतर पद्मिनी यांच्या नावाची खूप चर्चा झाली. याशिवाय पद्मिनीचे लग्नही चर्चेचा विषय बनले होते. पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही भूमिकेस नकार दिला नाही आणि सर्व प्रकारच्या चित्रपटांत काम केले. म्हणूनच ती निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंती ठरली. पद्मिनीने बॉलिवूडमधील जवळपास १०० चित्रपटांत काम केले आहे, त्यापैकी सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, इंसाफ का तराजू, प्यार झुकता नहीं, सौतन, काबिल के काबिल, वो सात दिन, आहिस्ता-अहिस्ता आणि सुहागन सारखे सुपरहिट चित्रपट दिले.