ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या बोल्ड अंदाजाने घातली सर्व तरुणांना भुरळ. सलमानची नजर तिच्या…

हिंदी टेलीव्हिजन विश्वात कायमच चर्चेत असणारा शो बिग बॉसचा 14 वा सत्र नुकताच सुरु झाला आहे. बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटीजने एन्ट्री घेतली आहे. आल्या आल्याच काहींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पण ह्या सर्वात जर एका मराठमोळ्या तरुणीची चर्चा मात्र जोरात रंगली आहे.

ह्या हॉट तरुणीचं नाव आहे निक्की तांबोळी. निक्की तांबोळीने शोमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच सर्वांच लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. फक्त प्रेक्षकांचंच नाहीतर निक्कीने सलमान खानचंही मन जिंकलं आहे. शोमध्ये एन्ट्री घेतानाच निक्कीने अनेक गमतीशीर गोष्टी सांगितल्या त्यामुळे तिची तुलना बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिजसोबत केली जाऊ लागली आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारी निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्च 1996 मध्ये झाला. निक्कीचे वडील उद्योजक आहेत. निक्कीचं शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये पूर्ण झालं आहे.निक्की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तमिळ, तेलगू चित्रपटांत निक्कीने भूमिका साकारलेल्या आहेत. तसेच चित्रपटांप्रमाणेच जाहीरातींमध्येही ती झळकली आहे. सध्या निक्की मुंबईत राहते.

निक्कीने ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री घेतना ‘दिलबर’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला आणि सलमान खानसह सर्वच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. निक्की एक मॉडल आणि अभिनेत्री असून तिने ‘कंचना 3’, ‘चिकती गदिलो चित्रकोट्टु’ आणि ‘थिप्पारा मीसम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच चर्चेत असणारी मराठमोठी निक्की तांबोळी आता बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वतः सलमान खान तिच्यावर नजर ठेवत असल्याचे त्याने कबूल केले आहे.