या अभिनेत्रीचा तरूणींना सल्ला,” विवाहित पुरुषांच्या प्रेमात चुकून पण पडू नका.. ते फक्त वापरून घेतात आणि..

आपल्या भारतीय समाजात विवाहबंधनाला स्त्रियांच्या पायात एखाद्या बेडी प्रमाणे अश्या प्रकारे बांधले जाते जणू लग्नाशिवाय त्यांना स्वतःच आयुष्यच नाहीये. कुटुंब वाढवण्यासाठी लग्न करणं गरजेचं आहे हीच आपली संस्कृती आहे आणि विचार आहेत. परंतु आता मात्र समाज थोडाफार बदलत चालला आहे आणि अनेक स्त्रिया लग्न करण्या पेक्षा सरळ पालकत्व स्वीकारत आहेत. पण अशा व्यक्तींना आजही समाजात वाईट दृष्टीने बघितले जाते.

पण आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री बद्दल आज सांगणार आहोत जिने आपल्या प्रेमप्रकरणानंतर गर्भधारणा झाल्यावर लग्न न करता सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला आणि आई व्हायचं ठरवलं. आणि ते ही आजच्या जमान्यात नव्हे तर 1980 च्या दशकात. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री निना गुप्ता बद्दल.

बॉलिवूड कलाकारांच्या संघर्षाच्या कथा आतापर्यंत तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. करिअर घडवण्यापासून ते खासगी आयुष्यापर्यंतच्या प्रत्येक स्थरावर त्यांचा झगडा सर्वांना दिसतो. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला.

नीना यांची ओळख उत्कृष्ट अभिनेत्रीसह सिंगल मदर म्हणूनही आहे. पण स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं त्यांच्यासाठी सोप्पं नव्हतं. लग्नाशिवाय नीना यांनी मुलगी मसाबा गुप्ताला जन्म देण्याचा आणि तिचं पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान आलेल्या कटू आठवणी यावेळी नीना यांनी सांगितल्या

अलीकडेच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलींना विवाहित पुरुषांशी लग्न न करण्याचे आवाहन केले. कारण त्या स्वतः यातून गेलो आहे. विवाहित पुरुषांबद्दल निताला खूप वाईट अनुभव आले आहेत. जे स्वतः अभिनेत्रीने व्हिडिओद्वारे सांगितले आहे.

नीना गुप्ता सांगतात की विवाहित पुरुष एका स्त्रीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्या काळात तो सांगतो की त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नाही आहे. पण घटस्फोट का घेत नाही असे जेव्हा त्याला विचारले जाते तेव्हा ते म्हणतात की हे सर्व सोपे नाही आहे, मग तो मुलांना मध्ये आणतो.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. त्या म्हणाल्या, ‘जर मला माझ्या आयुष्यातील कोणती चूक सुधारण्याची संधी मिळाली तर मी लग्नाआधी झालेले ही चूक सुधारेन. प्रत्येक मुलाला आई- बाबांच्या प्रेमाची गरज असते. मी मसाबासोबत प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे शेअर केली. यामुळे आमच्या नात्यावर या सर्व गोष्टींचा परिणाम झाला नाही. पण तिनेही संघर्ष केला.’

१९८० मध्ये नीना गुप्ता वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. विवियन यांच्यापासूनच नीना यांना मसाबा ही मुलगी झाली. नीना आणि विवियन यांनी कधीही लग्न केलं नाही. नीना यांनी एकट्यानेच मुलीचा सांभाळ केला. आज मसाबा प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव आहे.

तर ६० वर्षीय नीना गुप्ता सध्या त्यांची सेकण्ड इनिंग तुफान एन्जॉय करताना दिसत आहेत. २०१९ मध्ये आलेल्या बधाई हो सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. या पुरस्काराबद्दल बोलताना नीना म्हणाल्या की, ‘जरा विचार करा.. या वयात तरूण कलाकारांनाही अनेकदा हा पुरस्कार मिळत नाही जो मला या वयात मिळाला. वय झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळतो.’

दोन वर्षांपूर्वी नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करत ‘मी मुंबईत राहते आणि मी अभिनेत्री म्हणून काम करते. काही काम असेल तर सांगा’ असा मेसेज केला होता. या पोस्टनंतर नीना यांच्याकडे अनेक चांगल्या सिनेमांच्या संहिता आल्या. लवकरच त्या कंगना रणौतसोबत पंगा सिनेमात दिसणार आहेत. याशिवाय रणवीर सिंगच्या ८३ सिनेमात त्या रणवीरच्या आईची भूमिका साकारणार आहेत. तसेच निखील अडवाणी आणि संजय मिश्राा यांच्या सिनेमांतही त्या दिसतील. याशिवाय अनेक प्रोजेक्ट भविष्यात येऊ घातले आहेत.