कास्टिंग काऊच वर अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव.. ” रात्री डिनरला बोलवतात आणि डायरेक्ट घालतात हात-

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्री सामान्य माणसाला कायमच हवीहवीशी वाटते. पण या इंडस्ट्री मध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग कावूचसारख्या गोष्टी घडत असतात.

ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि अवाढव्य आहे की या मध्ये हरॅसमेंट आणि कास्टिंग काउचचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. याचे कारण आहे रोज लाखो तरुण तरुण्या या चंदेरी दुनियेची स्वप्न घेऊन या इंडस्ट्री मध्ये येतात पण सगळ्यांनाच संधी मिळतेच असे नाही.

मग अशा वेळेस छोटा मोठा का होईना परंतु आपल्याला काहीतरी काम मिळावं या हव्यासापोटी अनेक अभिनेत्र्या अशा प्रकारचं कोंप्रोमाईज करायला तयार होतात. त्यांची इच्छा असो व नसो पण या ग्लॅमर च्या दुनियेत टिकून राहण्यासाठी अशी पाऊले उचलली जातात पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात.

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ८’मधील स्पर्धक अभिनेत्री मिनिषा लांबा ही चर्चेत आहे. लाइमलाइटपासून दूर असलेल्या मिनिषाने तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केल्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. दरम्यान तिने कास्टिंग काउचचा देखील अनुभव सांगितला आहे.

नुकताच मिनिषाने आरजे सिद्धार्थ कन्ननसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी तिने कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे. ‘कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पुरुष असतात तेथे असे घडतच असते.

फिल्म इंडस्ट्री याला अपवाद नाही. मला देखील असा अनुभव आला होता. एखादी व्यक्ती तुमच्याशी चित्रपटाविषयी बोलत नाही आणि अचानक रात्री डिनरला येशील का? असे विचारातात. आणि मग डिनर ला एखादी अभिनेत्री गेलीच तर डायरेक्ट विषयात हात घालतात आणि त्यांचं काम साधून घेतात’ असे मिनिषा म्हणाली.

अनेकदा निर्माते ऑफिस बाहेर भेटण्यास सांगत असत असे मिनिषा पुढे म्हणाली होती. बऱ्याच वेळा मिनिषा निर्मात्यांना ऑफिसमध्ये भेटण्यासाठी जात असे. पण निर्मात्यांनी तिला बाहेर भेटण्यास सांगितले होते. मात्र तिने नकार दिल्यामुळे तिला अनेक प्रोजकेट्स गमवावे लागले होते. मिनिषा अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नव्हती.

मिनिषाने २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यहां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बचना ऐ हसीनों’, ‘हनीमून ट्रॅवल्स प्राइवेट लिमिटेड’ आणि ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या काही दिवसांपासून मिनिषा चित्रपटांपासून लांब आहे. ती सध्या ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. ती ‘बिग बॉस ८’मध्ये सहभागी झाली होती.

.