‘बजरंगी भाईजान’ मधली लहानग्या मुन्नीनचे आताचे फोटोज झाले व्हायरल.. नवीन अवतार पाहून सगळेच झाले चकीत..

बॉलिवूड मध्ये रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत बालकलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत. पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. तर चला आपण आज जाणून घेऊयात अशाच एका बाल-कालाकाराबद्दल..

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामधील लहान मुन्नी उर्फ ​​हर्षाली मल्होत्रा आठवतेय का ? हर्षालीने कबीर खान दिग्दर्शित 2015 साली प्रदर्शित ‘बजरंगी भाईजा’ या चित्रपटाच्या मुन्नीच्या भूमिकेतून अनेकांची मने जिंकली. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ पाच वर्षे झाली आहेत, परंतु अजूनही मुन्नी सगळ्यांच्या लक्षात असेलच इतकी चाल भूमिका हर्षालीने केली होती. हर्षाली मल्होत्रा सध्या काय करते ? चला जाणून घेऊयात.

हर्षाली मल्होत्रा ​​आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे. दिवाळी प्रसंगी आपल्या चाहत्यांना आणि अनुयायांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्रीने स्वत: चे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोज मध्ये हर्षाली खूपच गोड दिसत आहे. हर्षालीचे हे फोटोज पाहून तुम्हाला तुम्ही वयस्कर झाल्यासारखे वाटेल हे नक्की.

हर्षाली मल्होत्रा इन्स्टाग्रामवर नेहमीच खूप सक्रिय असते आणि तिच्या दररोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना नियमितपणे तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दिवाळीच्या दिवशी हर्षाली ने लाल सलवार कमीजमध्ये स्वत: चे फोटो शेअर केले. यातील एका फोटोत हर्षाली हातात पणती घेऊन दिसत आहे.

दुसर्‍या एका फोटोमध्ये हर्षाली एका रांगोळीच्या शेजारी बसलेली दिसली आहे जी तिच्याद्वारे तयार केली गेली आहे. “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष आपण सर्वांसाठी आनंददायक आणि आल्हाददायक जावे. सुरक्षित रहा …’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे

दिवाळी सोबतच हर्षालीने भाऊबीज सेलिब्रेशनचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. भाऊबीजसाठी तिने गुलाबी रंगाची सलवार कमीज परिधान केली होती आणि चित्रांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तिने लिहिले, “एक असा व्यक्ती जो मला खूप त्रास देतो पण तितकंच प्रेमही करतो तो म्हणजे माझा भाऊ …. भाऊबीजेच्या शुभेच्छा,” तिने लिहिले

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून हर्षाली मल्होत्राने बाल अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने पाकिस्तानातल्या सहा वर्षांच्या अबोल मुलीची भूमिका साकारली, जी भारतात हरवली होती. हा चित्रपट अश्रू अनावर करणारा होता आणि हर्षालीचे तिच्या या चित्रपटातील अभिनयाबद्दल खूप कौतुक करण्यात आले होते. त्यावर्षी बजरंगी भाईजानमधील भूमिकेसाठी तिने सर्वोत्कृष्ट डेब्यू महिला पुरस्कारही जिंकला होता.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, करीना कपूर आणि मेहेर विज यांनीही काम केले होते. ‘बजरंगी भाईजान’ नंतर हर्षाली मल्होत्रा ​​’कुबूल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेतही दिसली. अभिनेत्रीने आत्तापर्यंत पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.