पहिल्या लग्नानंतर मूल नव्हते म्हणून ‘या’ अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न.. दीड महिन्यातच शेअर केली गुड न्यूज

या जगात पालक होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. कारण एखादे मुल असल्याशिवाय माणसाचे कुटुंब आणि आयुष्य अपूर्ण दिसते. बॉलिवूड मधील अनेक सुप्रसिद्ध जोडपे देखील आता फॅमिली प्लॅनिंग च्या तयारीत दिसत आहेत. नुकतंच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडप्याने एका सुंदर कन्येला जन्म दिला.

तसेच तैमुर नंतर आता करीनाही दुसऱ्यांदा आई झाली. सैफ अली खान आणि करीना कपूर या जोडप्याने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अशा वातावरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्र्या आहेत, ज्यांनी नुकतंच लग्न केलंय, त्यांच्याकडे आता सर्वांची नजर रोखून लागली आहे. या यादीमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे.

अभिनेत्री दिया मिर्झाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. दिया मिर्झाने लग्नानंतर दीड महिन्यांतच गूड न्यूज दिली आहे. आपल्या चाहत्यांसह तिने आपला हा आनंद शेअर केला आहे. बेबी बम्पसह दियाने आपला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दियाने 15 फेब्रुवारी, 2021 आपला खास मित्र आणि उद्योजक वैभव रेखीसोबत लग्न केलं. लग्नानंतर पहिल्यांदाच दिया दिसली तेव्हा तिचे फोटो पाहू ती प्रेग्नंट आहे की काय अशा चर्चांना उधाण आहे. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. दिया खरंच प्रेग्नंट आहे. तिने बेबी बम्पसह आपला फोटो शेअर केला आहे.

दिया आणि वैभव एकमेकांचे खास मित्र. त्यांच्या मैत्रीचं रूपांत प्रेमात झालं, अनेक वर्षे ते नात्यात होते. अखेर 15 फेब्रुवारी, 2021 मध्ये तिने लग्नगाठ बांधली. दियाचा लग्नसोहळाही चांगलाच चर्चेत होता. दियाच्या लग्नाच्या विधीही महिला पुजाऱ्यानं केल्या.

याशिवाय तिचं कन्यादान आणि पाठवणी झाली नाही. यावरून तिच्यावर टीका होऊ लागली आणि तिला अनेकांनी प्रश्न विचारले. दियाने सोशल मीडियावर पोस्ट करत या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली होती. अनेकांना तिचा अभिमाम वाटला तर काहींनी तिला ट्रोल देखील केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आपल्या सौंदर्यामुळं सतत चर्चेत असते. दियानं अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या अनेक सिनेमांना चाहत्यांची पसंतीही मिळाली. सध्या अभिनेत्री मालदीवमध्ये सुट्टी इन्जॉय करत आहे. याचे फोटो अभिनेत्रीनं नुकतेच शेअरदेखील केले आहेत.

वैभवने याआधी सुनैना हिच्याशी लग्न केलं होत. सुनैना ही एक योगा ट्रेनर आहे. या लग्नापासून या दोघांना एक मुलगी देखील आहे. वैभव हा उद्योजक आहे.गेल्या काही महिन्यांपासून दिया आणि वैभव हे नात्यात होते. अखेर त्यांनी 15 फेब्रुवारीला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला.

सुनैना ही योगा ट्रेनर असून तिने बॉलिवूडमधील अनेकांना ट्रेन केलं आहे.तर दिया ही बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. ’रेहना हे तेरे दिलमे’ या चित्रपटामुळे तर ती तरुण वर्गात खूपच फेमस झाली होती.