‘मैने प्यार किया’ मधली भाग्यश्री आता दिसते आधीपेक्षा सुंदर आणि हॉट..

भाग्यश्रीने ‘मैंने प्यार किया (मैने प्यार किया)’ चित्रपटातून सलमान खानबरोबर सिनेमासृष्टीत पदार्पण केलं होतं आणि या दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. पण भाग्यश्रीने या चित्रपटा नंतर लगेचच लग्न केले आणि चित्रपटांना निरोप दिला. पण भाग्यश्रीची जुनी मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यात तिने चित्रपटांमध्ये काम करणे का बंद केले आहे हे सांगितले आहे.

भाग्यश्री तिच्या मुलाखतीत म्हणाली, ‘माझा नवरा माझ्याबद्दल खूप सकारात्मक आहे पण त्यांना माझे दुसर्‍या माणसाबरोबर पडद्यावर रोमांस करणे पसंत नाही. पण माझे बाकीचे सासरचे लोक त्यांच्यापेक्षा माझ्या अभिनयाबद्दल अधिक खुल्या विचारांचे होते. इतकेच नाही तर भाग्यश्री आणि हिमालय यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल सर्वात प्रथम सलमान खानला माहिती मिळाली. ‘दिल दीवाना’ या गाण्या दरम्यान सलमान खानला त्यांच्या प्रेमाची कल्पना आली.

‘मैंने प्यार किया’ हा एक चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट ठरला. याच चित्रपटातून भाग्यश्री आणि सलमान खान यांनी नायक-नायिका म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्या यांनी केले होते आणि सिने-रसिकांच्या मनात प्रेम-सुमनची पात्रं अजूनही ताजी आहेत.

सुरज यांनी भाग्यश्रीला त्यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाची ऑफर दिली. पण भाग्यश्री या खूप अभ्यासू होत्या त्यांनी काही अटी सुरज यांच्या समोर ठरवल्या. त्यांना कॉलेज करून या चित्रपटाची शूटिंग करायची होती. तसेच चित्रपटात कोणताही किसिंगचा शॉट नाही देणार तसेच कमी कपडे न घातला नेहमी पूर्ण कपडे घालेन अशाही अटी घातल्या.

सुरजने या सगळ्या अटी मान्य केल्या. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा खूप पैसे कमावले आणि भाग्यश्री रात्रीतच प्रसिद्ध झाली. बरेच दर्शक भाग्यश्रीला या चित्रपटामुळेच ओळखू लागले. सलमान खान हे त्या चित्रपटात अभिनेता होते. सुरज यांचीही ही नवीन सुरुवात होती. त्यांचेही नुकतेच लग्न झाले होते. ज्यावेळी मैने प्यार किया या चित्रपटाचे शूटिंग होत होते तेव्हा भाग्यश्री १८ वर्षांच्या होत्या. या शूटिंगच्या वेळी भाग्यश्री खऱ्या आयुष्यात हिमालया नाव असलेल्या मुलाच्या प्रेमात होत्या. भाग्यश्रीच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला कारण भाग्यश्री अजून लहान होती.

नंतर भाग्यश्रीने हिमालयाना फोन करून सांगितले की आपण आजच जाऊन लग्न करूया नाहीतर आपले लग्न नंतर होऊ शकणार नाही. दोघांनी सलमान खानच्या उपस्थितीत लग्न केलं. आता या दोघांनाही एक मुलगा आणि मुलगी आहेत. लग्नानंतरही ‘लौट आवो त्रिशा’ या मालिकेत काम केले. यांचा मुलगा अभिमन्यू, यानेही नंतर चित्रपट आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या मुलीचे नाव आहे अवंतिका जिला चित्रपटांमध्ये अजिबात रस नाही. भाग्यश्री या कमीत कमी वेळेत आणि वयात जास्त प्रसिद्ध झाल्या जे कौतुकास्पद आहे.