‘लक्ष्मी बॉ-म्ब’ चित्रपटात झळकलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्यासमोर अक्षय कुमार पडला फिका.. पण फक्त 14 मिनिटांचा रोल दिल्याने चाहते नाराज..

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे पूर्णपणे ठप्प असलेली आपली हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजेच बॉलिवूड आता अनलॉकच्या काळात हळू हळू पुन्हा पूर्व पदावर येत आहे. थिएटर्स जरी अजून सुरू झाले नसले तरी चित्रपटांची शूटिंग मात्र सर्व नियमांचे पालन करून पूर्ण जोमात सुरू आहे. त्यामुळेच अनेक निर्मात्यांनी चित्रपट थिएटर्स मध्ये रिलीज न करता नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या अँप्स वर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे

अशाच प्रकारे अक्षय कुमार स्टारर फिल्म ‘लक्ष्मी’ सोमवारी डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तामिळ हॉरर कॉमेडी फिल्म ‘कंचना’चा हा अधिकृत हिंदी रिमेक चित्रपट आहे. अभिनेता राघव लॉरेन्स, ज्याने तमिळ ‘कंचना’ मध्ये मुख्य भूमिका पार पाडली होती, तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज निर्मित या सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका निभावली आहे.

चित्रपटात अक्षय कुमार एका मुस्लीम मुलाची भूमिका साकारत आहे, जो रश्मी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि नंतर पळून लग्न करतो. रश्मीची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणीने निभावली आहे. भुताटकी बेस्ड असलेल्या या चित्रपटात भन्नाट कॉमेडीही आहे. या चित्रपटात एका अशा मराठमोळया अभिनेत्यानं काम केलंय, ज्याला ट्रेलरमध्ये कुठेच दाखवण्यात नव्हते आले, परंतु चित्रपटात त्याच्या एन्ट्रीवर मात्र सगळेच चकित झाले.

आम्ही बोलत आहोत मराठमोळा अभिनेता ‘शरद केळकर’ बद्दल. या चित्रपटामध्ये शरदला फक्त 13-14 मिनिटांची भूमिका मिळाली आहे. परंतु असे असले तरी त्याने ती अगदी जीव ओतून साकारली आहे. प्रेक्षक तसेच समीक्षकांनी शरदच्या या भूमिकेचे तोंड भरून कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय की “अक्षय कुमार जर या चित्रपटाचा हृदय होता तर शरद केळकर या चित्रपटाचा आत्मा असल्याचे सिद्ध झाले आहे.”

आणखी एका व्यक्तीची प्रतिक्रिया काही अशी होती, “शरद केळकर यांनी लक्ष्मीला खूप वास्तविक बनवले आहे. या अद्भुत चित्रपटातून मी एकच धडा घेतला आहे तो म्हणजे अंडर-रेटेड अभिनेता शरद केळकर यांच्याविषयी ची माझी आस्था खूपच वाढली आहे.” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “मी खरंतर अक्षय कुमार सरांचा खूप मोठा चाहता आहे. पण या चित्रपटाचा खरा नायक शरद केळकर आहे. अतिशय कमालीचा अभिनय आणि हावभाव.”

एका नेटकऱ्याने लिहिले, “जेव्हा शरद चित्रपटात रडला तेव्हा माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं. या अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” खरंतर हा चित्रपट अगदीच सामान्य आहे परंतु शरदने आपल्या भूमिकेने तो असामान्य बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

अनेक चाहत्यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे की शरदला फक्त 15 मिनिटांचा रोल देण्यात आला. आणखी काही वेळ त्याला दाखवण्यात आलं असतं तर नक्कीच हा चित्रपट काही औरच कमालीचा झाला असता. परंतु असे न झाल्याने चित्रपटाला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर आपटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

शरद ने या आधी ‘तान्हाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. ही भूमिका इतकी प्रचंड गाजली की शरदचे बॉलिवूड मध्ये करोडो चाहते झाले आहेत. यापुढेही शरद कडे अनेक प्रोजेक्ट्स असल्याचं शरद ने एका मुलाखतीत सांगितलं आहे