एक नव्हे तर दोन-दोन लग्न केले आहे या अभिनेत्रीने, गोविंदाला या अभिनेत्रीसोबत लग्न करायचे होते

आपल्या सर्वांना बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी ही आठवत असेलच. या अभिनेत्रीचा जन्म ९ नोव्हेंबरला हाँगकाँगमध्ये झाला होता. या अभिनेत्रीने बॉलिवूडमधल्या बऱ्याच सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. परंतु सध्या ती बॉलिवूड पासून लांब आहे म्हणजे तिने आता बॉलिवूड मध्ये काम कर्मे सोडून दिलेले आहे.

अभिनेत्री नीलम कोठारी ही सध्या एक स्वतःचा व्यवसाय करत आहे आणि म्हणूनच ती आता साध्याला चर्चेत आली आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीने जवानी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करण जोहर तिच्या बरोबर होता. या अभिनेत्रीचा पहिलावहिलाच चित्रपट हा फुल्ल फ्लॉप ठरला होता.

पण त्यानंतर तिला बर्‍याच चांगल्या ऑफर्स देखील मिळाल्या. नीलम कोठारीने इल्जाम या पहिल्या चित्रपटात गोविंदाबरोबर काम केले होते आणि त्यानंतर तिने त्याच्याबरोबर १० चित्रपटांमध्ये पुढे काम केले त्यापैकी ६ चित्रपट हिट ठरले. नीलमने चंकी पांडे सलमान खान आमिर खान सारख्या मोठ्या सुपरस्टार्सबरोबर काम केले.

नीलम कोठारी कुछ कुछ होता है हम साथ साथ साथ हैं लव्ह 86 खुदगर्झ ह-त्या एक लडकी एक लडका ताकदवर अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. नीलम आणि गोविंदाची जोडी 80 आणि 90 च्या दशकात चांगलीच गाजली होती. दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी नीलम आणि गोविंदाचा पहिला चित्रपट इल्जाममध्ये चांगला प्रतिसाद दिला होता. दरम्यान गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला आणि नीलमबद्दल खूप सिरीयस झाला होता.

गोविंदा एकदा इंटरव्यूमध्ये म्हणाले होते की मी सेटवर विनोद सांगून नीलमला हसवायचा. गोविंदाची नीलमशी लग्न करण्याची इच्छा होती. पण त्याचवेळी सुनीताची तिच्या आयुष्यात एन्ट्री झाली. सुनीताशी सगाई करुनही नीलम गोविंदाच्या मनातून बाहेर पडली नाही आणि यामुळे त्याने सुनीताशीचे प्रेमसं बंध तोडले.

नंतर त्याने आपल्या आईशी नीलमशी लग्न करण्याची इच्छा असल्याची व्यक्त केली. पण त्याच्या आईची इच्छा नव्हती आणि यामुळे गोविंदाने सुनीताशी लग्न करावे लागले. गोविंदाशिवाय नीलमचे बॉबी देओलसोबत प्रेमसंबंध होते. धर्मेंद्र यांच्यामुळे नीलम आणि बॉबी देओल यांचे नाते संपले कारण धर्मेंद्रला हे नातं आवडत नव्हतं.

नीलमचा पहिला विवाह युके चा बेस्ट बिझनेसमॅन चा मुलगा ऋषी सेठिया याच्याशी झाला होता पण या दोघांचे लग्न बरेच दिवस टिकले नाही त्यानंतर तिने 23 जानेवारी 2011 रोजी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता समीर सोनीशी लग्न केले. लग्नाच्या 2 वर्षानंतर समीर आणि नीलम यांनी 1 मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आणि दत्तक घेतलेल्या मुलीचे माव अहाना असे आहे.

तिने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. पण ती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. आजकाल ती व्यवसायात नाव कमावत आहे. तिने स्वत: च्या नावाने ज्वेलर्स कंपनी सुरू केली आहे. नीलमने 1984 मध्ये जवानी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता.

गोविंदाला नीलम आवडत होती – गोविंदाला अभिनेत्री नीलम खूप आवडतं होती. गोविंदा नीलमबद्दल खूप सिरीयस होता. एका मुलाखतीत गोविंदाने खुलासा केला की प्रणलाल मेहता यांच्या ऑफिस मध्ये त्याने नीलमला सर्वात अगोदर बघितले होते. त्यावेळी नीलमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. गोविंदा म्हणाला की तिचे लांब केस पाहून त्याला असे वाटले की जणू ती एक परिच आहे की काय.