जो वाटत होता छोटा मोठा स्टार.. तो आहे खऱ्या आयुष्यात बच्चन कुटुंबाचा जावई..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही नेहमीच भारतीयांसाठी चर्चेचा विषय राहिली आहे. बॉलिवूडमध्ये रोज हजारो कलाकार आपलं नशीब आजमवायला येतात. त्यातील काही आपली छाप सोडतात तर काहींना पहिल्याच प्रयत्नानंतर बॉलिवूड सोडावं लागतं.

पण काही स्टार किड्स आपल्या फॅमिलीच्या असलेल्या ओळखीच्या जोरावर टिकतात. दररोज बॉलिवूडशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या बातम्या मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. पण पडद्यामागे अशा काही बातम्या दडलेल्या असतात ज्याबद्दल आपल्याला वर्षानुवर्षे सुगावासुद्धा लागत नाही.

पण नंतर जेव्हा अचानक आपल्याला काहीतरी नवीन अनपेक्षित माहिती मिळते तेव्हा आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो. असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे इंडस्ट्रीमधील कनेक्शन्स आपल्याला माहीत नाहीत.आज आपण अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्याचं नाव आहे कुणाल कपूर.

कुणाल कपूर बॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत बरीच प्रगती केली. रंग दे बसंती, डॉन 2, डियर जिंदगी, बच्चन ए हसीनो सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये कुणालने काम केले आहे. पण कुणाल कपूरचा अमिताभ बच्चनशी असलेलं नातं तुम्हाला माहिती आहे का..

हरिवंश राय बच्चन आणि श्यामा बच्चन अमिताभ बच्चन आणि अजिताभ बच्चन यांचे पालक आहेत. अमिताभ बच्चन यांच्या भावाने रामोला बच्चनशी लग्न केले आणि त्यांना नयना बच्चन, नम्रता बच्चन आणि नीलिमा बच्चन या तीन मुलींना जन्म दिला. अजिताभ बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी नयना बच्चन हिचे कुणाल कपूरशी लग्न झाले. या दोघांनी 2015 साली लग्न केले होते. म्हणूनच कुणाल कपूर अमिताभ बच्चन यांचे जावई आहेत.

वृत्तानुसार, कुणाल कपूर आणि नयना बच्चन यांनी 9 फेब्रुवारी 2015 रोजी विवाहबंधनात अडकले होते. सेशेल्समध्ये एका खासगी कार्यक्रमात सर्व कुटुंबियांच्या समवेत दोघांनी लग्न केले होते. अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि नयना बच्चनची चुलत बहीण श्वेता बच्चन नंदा यांनी या जोडप्याची ओळख करुन दिली होती.

कुणाल कपूर बहुतेकदा सोशल मीडियावर आपल्या पत्नीसमवेत मनमोहक छायाचित्रे पोस्ट करताना दिसतात. अनेकदा हे जोडपं सण साजरे करताना बच्चन कुटुंबियांसोबत दिसून येतं. इन्स्टाग्रामवर सुद्धा या जोडप्याचे अनेक चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांचे बरेच आगामी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. अमिताभ लवकरच आयुष्मान खुरानासमवेत गुलाबो सीताबो चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव शुजित सिरकर आणि जूही चतुर्वेदी यांनी लिहिले आहे. विनोदी नाटक शैलीवर आधारित हा चित्रपट आहे. त्याशिवाय ते ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसणार आहेत.