लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच आलियासोबत मोठा विश्वासघात; उचललं टोकाचं पाऊल

बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट ही सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. आलिया भट्ट हिने स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या या चित्रपटामध्ये तिला प्रचंड यश मिळाले.

मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलिया भट्ट हिच्यावर जोक देखील खूप मोठ्या प्रमाणात होत होते आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील तिचा मजाक करण्यात आला. मात्र, तिने कधीही वाईट वाटून घेतले नाही. आलिया भट्टचे सुरुवातीला वरून धवन याच्या सोबत नाव जोडले गेले होते. त्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा याच्या सोबतही तिचे प्रेम संबंध असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे गेल्या काही दिवसापासून एकत्र राहताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये कपडे बदलल्या यासारखे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे बदलण्यात येतात. याचा एक दाखला म्हणजे रणबीर कपूर हा होय. रणबीर कपूर याने अनेक अभिनेत्रींसोबत प्रेम प्रकरण केले आहेत.

सावरिया चित्रपटातून त्याने पदार्पण केल्यानंतर सोनम कपूर हिच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते. त्यानंतर त्याचे नाव दीपिका पदुकोणच्या सोबतही जोडले गेले. ये जवानी है दिवानी या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे अनेक वर्षे एकत्र राहिले.

या दोघांचे बिकिनीमधील फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र, रणबीरने तिला सोडचिठ्ठी दिली. आता कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्न केले आहे. तर आता गेले काही दिवस आपण आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे एकत्र राहताना दिसतात. एकाच घरात दोघे अनेक दिवसांपासून राहताना दिसत आहेत.

तसे या दोघांचे नाते त्या दोघांच्या कुटुंबियांना मान्य आहे आणि ते लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येते. मात्र, अद्याप लग्नाची तारीख जाहीर झाली नाही. मात्र, असे असले तरी लग्नाच्या आधीच आलिया भट्टच्या सोबत एक धोका झाला आहे, असे सांगण्यात येत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची दाट चर्चा सध्या रंगत आहे.

मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र असे असताना आता इंस्टाग्राम वर आलियाची एक गोष्ट चर्चेत आली आहे. आलिया हिने अनेक पोस्ट डिलीट केल्या आहेत. आलिया सध्या आर आर आर या चित्रपटामुळे तुफान चर्चेत आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजताना दिसत आहे.

या चित्रपटात ती चांगल्या पद्धतीने वावरताना दिसत आहे. मात्र, असे असताना आलिया ही नाराज झाल्याचे दिसत आहे. या चित्रपटातील तिचा रोल खूपच छोटा करण्यात आला आहे. त्यामुळे तिने आपल्या इंस्टाग्राम पेज वरून आर आर आर या सिनेमाच्या काही पोस्ट देखील डिलीट करून टाकल्या आहेत.

तसेच दिग्दर्शक एस एस राजमौली यांनाही अन् फॉलो केल्याची देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आलिया भट आणि राजमौली यांचे भविष्यात वाजणार हे मात्र नक्की आहे.