आमिरच्या 3 Idiots मधील ‘मिलिमीटर’ला पाहिलं का? आज ओळखूही येत नाही

काही चित्रपट हे विविध कारणांनी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशा चित्रपटांमध्ये येणारं एक नाव म्हणजे 3 Idiots . आमिर खान, शर्मन जोशी, आर. माधवन यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं सर्वांनाच एका वेगळ्या दुनियेत नेलं.

चित्रपटातील प्रत्येक पात्रानं चाहत्यांच्या मनात कायमचं घर केलं. त्यातलाच एक चेहरा म्हणजे मिलिमीटर. आठवतोय का तो हॉस्टेलमधल्या मुलांसोबत धमाल करणारा, संचालकांची नक्कल करणारा मिलिमीटर ? ‘3 Idiots’ मधील हा चेहराही कमालीचा लोकप्रिय झाला.

राहुल कुमार यानं ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याचा एक डायलॉग होता, ‘मिलिमीटर अब सेंटीमीटर बन चुका है…’.

हा डायलॉग खरंच त्याला लागू झाला आहे. कारण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला आणि त्यानंरही बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्यातील या पात्राची चर्चा होते तेव्हा तो किती बरं मोठा झाला असेल, हाच प्रश्न मांडला जातो. आता हा बालकलाकार एक हँडसम तरुण झाला आहे.

26 वर्षीय राहुलनं काही चित्रपट आणि मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यानं स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे पाहताना अरेच्छा हा तोच मिलिमीटर आहे का असाच प्रश्न आश्चर्यचकित होत चाहते विचारत आहेत.