लोकप्रिय अभिनेत्याची जीभ घसरली; आयुष्यात दोन गोष्टी गरम पाहिजेत, जेवण आणि….

बॉलिवूड अभिनेत्री हल्ली एका रिअलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तिच्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धक काही गौप्यस्फोट करत आहेच. तर, काही धमाल करताना दिसत आहेत.

‘लॉक अप’ या कार्यक्रमातील बरेच व्हिडीओसुद्धा सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथं स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीचं बोलणं ऐकून अनेकांनाच धक्का बसला. सध्या कार्यक्रमात साईशा शिंदे आणि मुनव्वर बरेच लोकप्रिय आहेत.

त्यांचे काही किस्से कमाल चर्चेतही आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये साईशा स्वयंपाकघरात काम करत असताना मुनव्वर तिथे येतो आणि तिची थट्टा करु लागतो. तुला स्वयंपाकघरात काम करायचं नाहीये तर सांग तू… असं मुनव्वर तिला म्हणतो. त्यावर भविष्यात एकत्रच काम करायचंय…. असं ती त्याला म्हणते.

या क्षणाला मुनव्वर आणि साईशा बरंच खोडकर बोलताना दिसते. तिथं मुनव्वर म्हणाला, मला दोन गोष्टी गरम लागतात. एक म्हणजे जेवण आणि दुसरं म्हणजे…. इतक्यावरच त्याचं खट्याळ हसू बरंच बोलकं होतं. मुनव्वर अर्ध्यावरच थांबतो हे पाहून बोलणं पूर्ण करण्याचा आग्रह साईशा त्याला करते.

त्यांची ही मस्ती इथं थांबत नाही. साईशासुद्धा मुनव्वरशी थट्टा करताना दिसते. थट्टा नव्हे फ्लर्टच म्हणावंल कारण, ती त्याला म्हणते, ‘मला आयुष्याच दोनच गोष्टी हव्या आहेत एक म्हणजे मुनव्वर आणि दुसरा म्हणजे फारुकी.’

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. शेअरही केला जात आहे. काही नेटकऱ्यांना मात्र मुनव्वरचं हे वागणं खटकल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.