या मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केले साडीतले ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल, फोटोंवरून नजर हटणार नाही

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा ‘दगडी चाळ 2’मध्ये दिसणार आहे. सध्या पूजा महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सरचमध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी पूजा सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते.

पूजाने नुकतेच तिचे इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ऑरेंज रंगाच्या साडीतलं फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. पूजाच्या फॅन्सनाही तिचे हे फोटोशूट आवडलं आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. ‘जंगली’ सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.